पंतप्रधानांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची सदिच्छा भेट
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. या भेटीदरम्यान कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.