काँग्रेस कार्यकारिणीची नवी दिल्ली इथं बैठक सुरू
नवी दिल्ली, २४: नवी दिल्लीत काँग्रेस पक्ष मुख्यालयात आज अध्यक्षपदासंदर्भात काँग्रेस कार्यकारिणीची दूरदृश्य संवाद प्रणालीमार्फत बैठक सुरू आहे. या बैठकीत पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी, आपल्याला हंगामी अध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची मागणी कार्यकारिणीकडे केली.
पक्षाच्या नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करावी, असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. माजी प्रधानमंत्री मनमोहनसिंह यांच्यासह पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी, सोनिया गांधींना बैठकीमधे हंगामी पदावर कायम राहण्याची विनंती केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळायला इच्छुक नसल्याल्यामुळे राहुल गांधी यांनीहे पद स्विकारावं, असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के. अँटोनी यांनी म्हटलं आहे.
या परिसरात गोळा झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत, गांधी कुटुंबीयांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचं वृत्त आहे. गांधी कुटुंबाशिवाय इतर कोणालाही काँग्रेस अध्यक्ष म्हणून स्वीकारणार नसल्याची भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे. सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळायला इच्छुक नसल्याल्यामुळे राहुल गांधी यांनीहे पद स्विकारावं, असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के. अँटोनी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, आनंद शर्मा, शशी थरुर तसंच मुकुल वासनिक आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांनी पूर्णवेळ काँग्रेस अध्यक्ष असावा, संघटनेच्या विविध पातळीवरील निवडणुका, सत्तेचं विकेंद्रीकरण, प्रदेश कार्यकारिणींचं सबलीकरण व्हावं, अशा स्वरुपाचं पत्र पाठवलं होतं.
त्यानंतर पक्षाच्या अंतर्गत मुद्यांवर सार्वजनिकरित्या चर्चा करणाऱ्या नेत्यांबद्दल पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त करत हे पत्र पाठवण्यासाठी ही वेळ योग्य नसून, आपण दुखावले गेले आहोत. हे मुद्दे कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चिले जावे, प्रसारमाध्यमांमधून नव्हे, असं म्हटलं आहे.
