Smriti Irani and Yogi Adinath
अर्ज भरण्यापूर्वी स्मृती इराणी यांनी पतीसह केली मंदिरात पूजा
अमेठी: उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज लोकसभेसाठी दाखल करण्यापूर्वी आपल्या पतीसह मंदिरात पूजा व होम हवन केले. पूजा व होम हवन झाल्यानंतर स्मृती इराणी रोड शो केला. यादरम्यान त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांचे पती जुबिन इराणी देखील होते.
२०१४ मध्ये देखील स्मृती इराणी यांनी अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरुद्ध उभ्या होत्या. २०१४ मध्ये स्मृती इराणी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी देखील राहुल गांधी यांना अमेठीतून स्मृती इराणी टक्कर देणार आहेत. राहुल गांधी अमेठी बरोबरच यावेळी केरळमधील वायनाड येथून देखील लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
