नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचा जीवनाच्या रंगभूमीला अखेरचा सलाम!
पुणे: कुणी घर देतं का घर? अशी आरोळी ठोकणारा एकेकाळचा नटसम्राट आज या पृथ्वीवरचा रंगमंच सोडून कायमचा निघून गेला. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. वसंत कानिटकर लिखित “इथे ओशाळला मृत्यू” या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी नाट्यसृष्टीत पदार्पण केलं. यांनतर त्यांच्या ‘नटसम्राट’ नाटकानेही अनेक विक्रम केले. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन चित्रपटात त्यांनी वठवलेली राजकारण्याची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली. व्ही. शांताराम दिग्दर्शित “पिंजरा” चित्रपटात तर त्याच्या अभिनयाची एक वेगळीच उंची पाहायला मिळाली. त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतही काही चित्रपट केले. त्यांनी लिहिलेले “वाचिक अभिनय” हे पुस्तक समस्त होतकरू नटांसाठी एक मार्गदर्शनपर गाईड ठरलय. “लमाण” हे श्रीराम लागूनच आत्मचरित्रहि वाचनीय आहे.
