“भारताने कोरोना काळात १५० देशांना आयुर्वेदाच्या माध्यमातून मदत केली”
पणजी, दि.१३: आयुर्वेद ही भारताची सर्वोत्तम पारंपरिक उपचारपद्धती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला गेली सात वर्षे आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून कार्य करण्याची संधी दिली, याचा विशेष आनंद आहे असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन तसेच बंदरे, नौवहन आणि जलमार्ग खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते रविवारी मडगाव येथे डॉ. टीना आयुर्वेद रुग्णालय आणि औषधालय याचे उद्घाटन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
Z7YJ.jpg)
आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळेच जगभर २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. तसेच भारतीय आयुष उपचारपद्धती अंतर्गत असलेल्या आयुर्वेद, युनानी, होमिओपथी आणि सिद्ध या पद्धतींना जगभर चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना संकट काळात भारताने ‘वसुधैव कुटुंबकम’ या भूमिकेतून घेत १५० देशांना आयुर्वेदाच्या माध्यमातून मदत केली. यातून भारताचे आयुर्वेद क्षेत्रातील श्रेष्ठत्व सिद्ध होते. आयुर्वेद केवळ रोगांवरील उपचारासाठी नाही तर रोगप्रतिबंधक यावरही कार्य करते. रोगाचे समूळ उच्चाटन करण्याची ताकद आयुर्वेदामध्ये आहे. गोव्यात आयुर्वेद रुग्णालय आणि औषधालयांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल श्रीपाद नाईक यांनी आनंद व्यक्त केला.
LSKQ.jpg)
तत्पूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात श्री नाईक यांनी फोंडा येथील द्वारकामाई सहकारी सोसायटीच्या 14 व्या वर्धापनदिनास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी श्रीपाद नाईक यांच्या हस्ते परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
I1W0.jpg)
QPVH.jpg)
**
