शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, कनिष्ठ पुत्र तेजस ठाकरे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर व स्वीह्य सहाय्यक तथा शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. वांद्रे पूर्व येथील या मतदारसंघातून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर निवडणूक लढवत असून याठिकाणी विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी सेनेविरोधात बंडखोरी केली आहे.
