राजकारण ! शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती
मुंबई, दि. २६ : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी राजकीय युती करण्याचा निर्णय घेतला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणूका एकत्रित लढवण्यात येणार आहेत, अशी घोषणा आज करण्यात आली.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून, विरोधी पक्ष संपवण्याचं केंद्राचं कारस्थान हाणून पाडण्यासाठी समविचारी संघटनांनी एकत्र यायला हवं असं ठाकरे म्हणाले. त्यासाठी ईतरही बरेचजण आग्रही आहेत, असं त्यांनी सांगितलं.
