AMICO office Shivjayanti Pic
वाचा या मुलींनी ऑफिसमध्ये कशा प्रकारे साजरी केली शिवजयंती
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात व जल्लोशपूर्ण वातावरणात पार पडली.
शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सगळीकडे वेगळाच माहोल होता. बऱ्याच जणांनी आपल्या गाड्यांवर भगवे झेंडे लावले होते. तसेच तरुणाई काल भगव्या कपड्यांमध्ये रंगून गेली होती. अशाच प्रकारे काल ठाणे पश्चिम येथे असलेल्या AMICO कंपनीच्या ऑफिसमध्ये काम करत असलेल्या मुलींनीही आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.
ह्या मुलींनी ऑफिसमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करून त्यांच्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढली. तसेच सर्वांनी डिझायनर भगव्या रंगाचे कुर्ते परिधान करत, कपाळावर चंद्रकोर टिकली, नाकात मराठामोळी नथ असा पेहराव करून मराठी संस्कृतीचे सुरेख दर्शन घडवून आणले.

तसे पाहायला गेले तर खासगी आस्थापनांमध्ये सध्याच्या काळात वेगवेगळे दिवस (डेज) साजरे करण्याचा ट्रेंड जास्त आहे. पण शिवजयंती सारखा दिवस अशा प्रकारे साजरा करणारे दुर्मिळच म्हणावेत. त्यामुळे आता ह्या मुलींचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या प्रसंगी ऑफिसचे प्रमुख रवी देवरस, मनोज मोहिते, संतोष वाळुंज यांसह अंकिता गवळी, पूजा साळुंखे, कांचन शिंदे, रेश्मा शिर्के, प्रणाली नागले, रेश्मा पवार, संगीता गोपरेड्डी, नम्रता पवार, मनाली कदम, योगिता यांचा सहभाग होता.
