…आणि शशी थरूर झाले भावुक
तिरुअनंतपुरम : काल तिरुअनंतपुरम येथील मंदिरात ‘तुलाभरम’ या धार्मिक विधीप्रसंगी जखमी झालेले काँग्रेस नेते शशी थरूर यांची आज संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी रुग्णालयात भेट घेतली. या भेटीत त्यांनी थरूर यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. या अचानक भेटीमुळे भावुक झालेल्या थरूर यांनी त्यांच्या सोबतच्या एका फोटो तसेच सोबत एक ट्विट पोस्ट केले आहे.
निर्मला सीतारमन यांच्या मनस्वी भेटीमुळे मन खूप भरून आलं आहे. निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आज सकाळी त्या मला भेटायला थेट इस्पितळात आल्या. शिष्टाचार हा भारतीय राजकारणातील एक दुर्मिळ गुण आहे. पण आज तो सीतारमन यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिला आहे.
काल येथील एका मंदिरामध्ये झालेल्या अपघातात काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या डोक्याला सहा टाके पडले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
Touched by the gesture of @nsitharaman, who dropped by today morning to visit me in the hospital, amid her hectic electioneering in Kerala. Civility is a rare virtue in Indian politics – great to see her practice it by example! pic.twitter.com/XqbLf1iCR5
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 16, 2019
