मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ
मनसेचे एकमेव आमदार म्हणून महाराष्ट्राला माहीत असलेले जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरद सोनवणे थोड्याच वेळात शिवसेना भवन येथे आपल्या कार्यकर्त्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून स्वगृही शिवसेनेत परतत आहेत. जवळपास १००० चारचाकी वाहनांची जुन्नर ते दादर, शिवसेना भवन अशी रॅली काढून ते येत आहेत. पण या साऱ्या पार्श्वभूमीवर मनसेत खळबळ उडाली आहे.
२०१४ साली विधानसभेच्या निवडणुकीआधी त्यांनी मनसेत प्रवेश केला होता आणि निवडणूक लढवली होती. आमदार झाल्यावर ते कधी मनसेच्या व्यासपीठावर न दिसता शिवसेनेच्या अन भाजप च्या नेत्यांबरोबरच जास्त दिसले. राज ठाकरेंशी त्यांनी विशिष्ठ अंतर राखलं.
