शरद पवार नातू पार्थ पवार यांच्यावर आद्यप नाराज? | म्हणाले, “नातवाच्या बोलण्याला काडीची किंमत नाही”
मुंबई, दि. १२: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दरम्यान मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रावर आज दुपारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी सुशांतसिंग राजपुतच्या मृत्यूप्रकरणावर मौन सोडत मुंबई पोलिसांची पाठराखण केली. पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.
याचा संदर्भ घेत एका पत्रकाराने पवारांना प्रश्न विचारला तेव्हा तर म्हणाले की, “माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही. तो इंम्युच्युअर आहे. पण सीबीआय मार्फत चौकशी कोणाला करायची असेल तर जरूर करावी.” एकूण आजच्या त्यांच्या सुरावरून पार्थ पवारांवर ते नाराज असल्याचे स्पष्ट जाणवतेय. पण या मागे कौटुंबिक वाद तर नाहीत ना अशीही कुजबुज सुरू झाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला. निवडणुकीपूर्वी शरद पवार नातवाला तिकीट देण्यास इच्छुक नव्हते पण कुटुंबात कलह नको म्हणून त्यांनी नातवाला अखेर तिकीट दिले होते.
