शरद पवार यांनी घेतली तिवरे धरणफुटी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांची भेट
चिपळूण:-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटीच्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी दुर्घटनास्थळी भेट दिली या भेटीत त्यांनी सदर दुर्घटनेत ज्या कुटुंबातील लोक लोक मृत्युमुखी पडले त्यांचे सांत्वन केले
या दौऱ्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये शरद पवार म्हणाले की घटनास्थळी बऱ्याच गोष्टी निदर्शनास आल्या जलसंपदा विभागाच्या निदर्शनास आणूनही ही घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले पुढे ते म्हणाले दुर्घटनेत वाहून गेलेल्या जमिनींची ही पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे वाहून गेलेल्या पिकांची नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे यानंतर शरद पवार व आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत त्यांच्या वारसदारांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे एक लाख रुपयांच्या अनुदानाचे धनादेश सुपूर्द करण्यात आले
दोन जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता तिवरे धरणाची एक बाजू कोसळायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता मोठा अनर्थ घडला या दुर्घटनेत 21 लोक मृत्युमुखी पडली.
