“संविधानात बदल करण्याचं भाजपाचं उद्दिष्ट” – शरद पवार यांचा गंभीर आरोप
नाशिक, दि. १२: विधानसभा निवडणुकीसाठी मविआ उमेदवाराच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाशिकच्या कळवण इथं सभा घेतली. संविधानात बदल करण्याचं भाजपाचं उद्दिष्ट असल्याचं पवार यावेळी म्हणाले. त्याकरताच लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून देण्याविषयी मोदी प्रचार करत होते, असं शरद पवार या वेळी म्हणाले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आज नाशिक जिल्ह्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आणखी चार प्रचारसभा होणार आहेत.
Source – AIR
