“……. पहाटेच्या शपथविधीचा फायदा झाला” – शरद पवार
पुणे, दि. २२: राष्ट्रपती राजवट उठली हाच पहाटेच्या शपथविधीचा फायदा झाला, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात चिंचवड तसंच कसबा पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं पत्रकार परिषदेत बोलत होते. कट्टर शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, असं ते म्हणाले. प्रचारासाठी नेत्यांच्या गर्दीने निवडणूक जिंकता येत नाही. गर्दी जनमानसात किती प्रभावी आहे, हे महत्त्वाचं असतं, असंही पवार यांनी नमूद केलं. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बोलताना, पवार यांनी पहाटेच्या शपथविधीपाठोपाठ आणखीही खुलासे करावेत, असं आवाहन केलं.
