Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

येत्या महाराष्ट्र दिनी सुरू होणार गडचिरोली येथे मृद व जलसंधारण विभागाचे कार्यालय – मंत्री शंकरराव गडाख

येत्या महाराष्ट्र दिनी सुरू होणार गडचिरोली येथे मृद व जलसंधारण विभागाचे कार्यालय – मंत्री शंकरराव गडाख

सर्वात जास्त वनसंपदा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात स्वतंत्र विभागीय कार्यालय कार्यान्वित नव्हते. हा जिल्हा चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यक्षेत्रात होता. आता तो स्वतंत्र झाल्याने जलसंधारण विभागाची कामे गतीने होण्यास मदत होणार असून आदिवासी बांधवांना संरक्षित सिंचन सुविधा निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे गडाख यांनी सांगितले.

मृद व जलसंधारण विभागाचे एक नवीन जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय निर्माण करण्यात येणार असून या कार्यालयासाठी १६ पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यांतर्गत ३ उपविभाग येणार आहेत. गडचिरोली उपविभागाअंतर्गत गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा हे तालुके असतील. अहेरी उपविभागाअंतर्गत अहेरी, सिरोंचा, भामरागड आणि एटापल्ली हे तालुके येतील. तर वडसा उपविभागाअंतर्गत वडसा, आरमोरी, कुरखेडा आणि कोरची हे तालुके येतील.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *