मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हाती शिवबंधन; नगर च्या राजकारणात खळबळ
मुंबई, दि. ११: सध्या कोणत्याच निवडणूका नाहीत त्यामुळे पक्षांतर-पक्षप्रवेश असे कार्यक्रम होण्याची शक्यता नाहीच. पण आज अनपेक्षितपणे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर जी उपस्थित होते.
गतवर्षीच्या विधानसभा निवडणुका झाल्यावर भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सत्तेसाठी राजकीय कलगीतुरा रंगला तेव्हा मोजक्या अपक्ष आमदारांपैकी शंकरराव गडाख हे एक होते ज्यांनी शिवसेनेला उघड पाठिंबा दिला.
