महाराष्ट्र राज्य जीएसटी पथकाची कारवाई
त्यानंतर २५ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य जीएसटीच्या पथकांद्वारे उल्हासनगर येथे असलेल्या मे. एम्पायर एंटरप्राइजेस, M/S. शंकर एंटरप्रायझेस आणि M/S. M. M. Enterprises या करदात्यांच्या विविध व्यावसायिक ठिकाणी तपासणी भेटी करण्यात आल्या. या सर्व करदात्यांनी घरोघरी गोळा केलेली वीज बिले यासारखी बनावट कागदपत्रे देऊन आणि जागा मालकांची परवानगी न घेताच, त्यांना अंधारात ठेवून भाडे-परवाना करार करून जीएसटी नोंदणी मिळवली असल्याचे तपासणी भेटीच्या वेळी आढळून आले.
या करदात्यांनी २१८.२६ कोटी रू. किंमतीच्या करपात्र मूल्याच्या बोगस पावत्या इतर करदात्यांना कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता त्यांनी त्यांच्या लाभार्थींना ३९.२८ कोटींचा आयटीसी दावा केला असल्याचे आढळले. याप्रकरणी २९ एप्रिल २०२२ रोजी महानगर दंडाधिकारी यांनी मे. शंकर एंटरप्रायझेसचे मालक शंकर आप्पा जाधव, (वय ३७), मे. एम्पायर एंटरप्रायझेसचे मालक बापू वसंत वाघमारे, (वय ३६), आणि दस्तऐवज संकलन एजंट आदेश मधुकर गायकवाड, (वय ३६) यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या तपासाची मोहीम राहुल द्विवेदी (आयएएस), राज्य कर सहआयुक्त, अन्वेषण-ए आणि संजय व्ही. सावंत, उपअभियंता. राज्य कर आयुक्त (DC-E-002) राज्य कर सहायक आयुक्त, गिरीश पी. पाटील, राहुल एच. मोहोकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कर विभागाचे इतर सहायक आयुक्त व राज्य कर निरीक्षक यांनी राबवली.
या आर्थिक वर्षात राज्य जीएसटी विभागाने आत्तापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. याव्दारे थकबाकीदार आणि करचोरी करणा-यांना, दोषींना पकडण्यात कोणतीही कसर सोडणार नसल्याचा कडक इशारा विभागाने दिला आहे.
