येत्या २७ जानेवारी पासून मुंबई वगळता राज्यातल्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा होणार सुरू
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातल्या पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा येत्या २७ जानेवारी पासून सुरू होणार आहेत. मात्र अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर इथल्या शाळां संदर्भात वेगळ्या सुचना दिल्या जाणार असल्याचं शिक्षण विभागा कडून सांगण्यात आलं आहे.
सर्व शाळांना कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुण्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली, मात्र मुंबईतल्या शाळा पुढील सुचना मिळेपर्यंत बंदच राहतील, अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे.
