स्टेट बँकेच्या लॉकर भाड्यात दुपटीने वाढ
मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडियानं लॉकरच्या भाड्यात वाढ केली आहे. जवळपास ३ हजार रुपयांपर्यंत ही वाढ करण्यात आली आहे. मोठ्या शहरांमध्ये छोट्या आकाराच्या लॉकरसाठी आता २ हजार रुपये भाडं द्यावे लागेल.
यापूर्वी हे भाडं १५०० रुपये होते. मध्यम आकाराच्या लॉकरसाठी ४ हजार तर मोठ्या लॉकरसाठी आता वर्षाला ८ हजार रुपये भाडं द्यावे लागेल. छोट्या शहरांमध्ये छोट्या आकाराच्या लॉकरचीसुविधा घेण्यासाठी पंधराशे रुपये भरावे लागतील. तर त्याहून मोठ्या आकाराच्या लॉकरसाठी वर्षाला ३ हजार ते ९ हजार रुपये शुल्क द्यावे लागेल. या शुल्कावर जीएसटी अतिरिक्त भरावा लागेल. येत्या ३१ मार्चपासून नवे दर लागू होणार आहे.
याशिवाय स्टेट बँकेने मुदत ठेवींच्या व्याजदरातही अर्धा टक्क्यांपर्यंत घट केली आहे. ४५ दिवसांपर्यंतच्या ठेवींवर आता ४ टक्के व्याज मिळेल. तर १ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक कालावधीच्या मुदत ठेवींवर ५.९ टक्के दराने व्याज मिळेल.
Credit – AIR
