स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) चालू आर्थिक वर्षात देशभरात ३०० नवीन शाखा उघडणार
मुंबई/नवी दिल्ली, दि. १७: स्टेट बँक ऑफ इंडिया वर्तमान आर्थिक वर्षात देशभरात ३०० नवीन शाखा उघडण्याची योजना आखत आहे. एसबीआय च्या सध्या देशभरात २२ हजार ४०५ शाखा आणि २३५ विदेशी शाखा आणि कार्यालये आहेत. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, बँक आणखी व्यवसाय सहयोगी जोडण्याचा विचार करत आहे. एसबीआय ने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १६ हजार ८८४ कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे, वर्षभरापूर्वीच्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा ६ हजार ६८ कोटी रुपये होता.
Source – AIR
