Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने २० ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने २० ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई, दि. १७: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने येत्या २० ऑगस्टपर्यंत त्यांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून जट प्रथा निर्मुलना संदर्भातील छायाचित्रांचं प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आलं आहे. बालगंधर्व कलादालनात हे प्रदर्शन आज सर्वांसाठी खुलं आहे. समितीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी गेल्या दहा वर्षात २७६ महिलांच्या जटा काढण्याचं काम केलं; त्यातील निवडक साडेसातशे छायाचित्र आणि त्या संदर्भातील बातम्यांची कात्रणं या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत.
आपल्या कामाविषयी बोलताना नंदिनी जाधव म्हणाल्या, आपण बघतो की, या अंधश्रद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की, आपण म्हणतो की देवदासी कायदा आला पण काडीची अंमलबजावणी झाली नाही, अजूनही या जटा आलेल्या मुलींची छुप्या पद्धतीने लग्न लावून देतात. या जटांच्या मध्ये सुशिक्षित महिलांचा यात समावेश आहे. आणि त्याचं प्रबोधन करण्यात मला दोन ते सात वर्ष लागली. आणि या महिलांचं प्रबोधन करून मी त्यांची जटेतून मुक्तता केली, महाराष्ट्र जट मुक्त कसा होईल ही आमची खूप इच्छा आहे, आम्हाला माहित आहे ही लढाई दशकांची नसून शतकांची आहे. पण आम्ही अंधश्रद्धा समितीचे लोकं जे काही इतर सामाजिक संघटना आहेत. त्यांना बरोबर घेऊन हे काम करण्याचा प्रयत्न करत आहोत.
Photo Source – Google

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *