NCP Png File
साताऱ्यात शरद पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या दोन गटातल्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
सातारा : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच पक्षाचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माण मतदार संघात गेले असता त्यांच्या भाषणादरम्यानच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण होत हाणामारी झाली.
फलटण मधील माण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारकीच्या स्पर्धेतील कविता म्हेत्रे आणि शेखर गोरे यांच्यात अंतर्गत वाद आहे. या वादातून कविता म्हेत्रे स्टेजवर बसल्यामुळे शेखर गोरे यांनी स्टेजवर न येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेखर गोरे यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी कविता म्हेत्रे यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कविता म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांनी गोरे यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.
हा वाद एवढा टोकाला गेला की, संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. या गोंधळामुळे शरद पवारांनी आपले भाषण थांबवले.
