संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ तारखेपासून होणार सुरु
नवी दिल्ली, दि. १५: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २९ तारखेपासून सुरु होणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल.
केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला मांडला जाईल. विविध मंत्रालयांच्या मागण्यांचा विचार करुन अहवाल तयार करण्यासाठी स्थायी समित्यांना वेळ मिळावा म्हणून १५ फेब्रुवारीला कामकाज तहकूब केलं जाईल.
अधिवेशनाचं दुसरं सत्र आठ मार्चला सुरु होईल, या अधिवेशनाचा समारोप ८ एप्रिलला होण्याची शक्यता आहे.
