“…नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली” – सामनातील अग्रलेखावरून मनसे नेते अमेय खोपकर यांची खा. संजय राऊत यांच्यावर टीका
मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना च्या अग्रलेखात आजचा विषय होता मनसेचे शॅडो कॅबिनेट. या अग्रलेखात मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर उपहासात्मक टीका केली आहे. याचा समाचार मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत घेतला आहे.
ते म्हणाले की, “शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली. अख्खा अग्रलेख ‘सावली’वर खर्च केल्याबद्दल ‘शॅडो’ संपादकांचे आभार. हा खेळ सावल्यांचा आत्ता कुठे सुरु झालाय. पिक्चर तो अभी बाकी है, भविष्यात ‘मोठी तिची सावली’ हा अग्रलेख लिहायला लागू नये असं काम महाखिचडीने करावं या सदिच्छा”
