“महाविकास आघाडी सरकार टिकून राहील”
मुंबई, दि. २४ : महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी अजूनही अनिश्चिततेच्या पातळीवर आहेत. आपल्याला आणखी आमदारांचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केला असून, गुवाहाटी इथल्या हॉटेलमधून तसा मजकूर केला आहे. शिंदे यांच्या सोबतच्या आमदारांनी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदे यांना बहाल करणारा मजकूर प्रसिद्ध केला आहे. शिंदे आणि त्यांच्या समवेतच्या आमदारांनी फार मोठी चूक केली असून, संधी गमावली आहे.
राज्यातलं महाविकास आघाडी सरकार टिकून राहील, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यम प्रतिनीधींना सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आघाडीचं पुढचं धोरण ठरवण्यात येईल, आणि रस्त्यावरची लढाईही आपणच जिंकू असं ते म्हणाले. दरम्यान, शिवसेनाच्या नेत्या कार्यकर्त्यांची बैठक मुंबईत सेना भवन इथं आयोजित करण्यात आली आहे.
