शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा होणार अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया; लीलावतीत होणार दाखल
मुंबई, दि. २: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना आज मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. उदया संजय राऊत यांच्यावर एंजिओप्लास्टी केली जाणार आहे. संजय राऊत यांच्यावर गेल्या वर्षी लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. तथापि, पुन्हा त्रास होऊ लागल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर आणखी एकदा एंजिओप्लास्टी केली जात आहे.
गेल्या वर्षी संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक सापडले होते. त्यावर शस्त्रक्रिया झाली. एप्रिल २०२० मध्ये त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार होती. तथापि, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ऑपरेशनला उशीर केला. लीलावती हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर मॅथ्यू आणि डॉ. मेनन राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करतील. आज संध्याकाळपर्यंत संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे कळते.
