“मजुर वर्ग चालत निघाला आहे हे चित्र चांगले नाही” – शिवसेना नेते संजय राऊत उद्विग्न
मुंबई: लॉकडाऊन च्या काळात आपल्या राज्यात परतणाऱ्या मजुरांचे सध्या अपुऱ्या वाहतुकीच्या साधनांपायी प्रचंड हाल होत आहेत. तीनच दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे थकून रेल्वे रुळांवर झोपलेल्या मजुरांवरून मालगाडी जाऊन करुण अंत झाला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सकाळी एक ट्विट करत उद्विग्नता व्यक्त केली. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणाले, “मजुर वर्ग चालत निघाला आहे हे चित्र चांगले नाही. लहान मुले त्यांच्याच बरोबर आहेत. रेल्वे त्यांच्या साठी गाड्या सोडायला तयार नाही. राज्य सरकारने खाजगी वाहनांना परवानगी देणे गरजेचे आहे. लोकं चालताना आजारी पडत आहेत. मरत आहेत. तयांचे चालणे तरीही थांबले नाही. बेकायदेशीर निघालेच आहेत ना?”
मजुर वर्ग चालत निघाला आहे हे चित्र चांगले नाही. लहान मुले तयांचया बरोबर आहेत. रेलवे त्यांच्या साठी गाड्या सोडायला तयार नाही. राज्य सरकारने खाजगी वाहनांना परवानगी देणे गरजेचे आहे. लोकं चालताना आजारी पडत आहेत. मरत आहेत. तयांचे चालणे तरीही थांबले नाही.बेकायदेशीर निघालेच आहेत ना?
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 10, 2020
