महाराष्ट्राची पॉवर वेगळी आहे; मध्यप्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही – खासदार संजय राऊत
मुंबई: काल मध्यप्रदेश मध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. राहुल गांधी यांचे एकेकाळचे निकटवर्तीय राहिलेले काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम केला. यावेळी त्यांच्यासोबत २२ आमदारांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यामुळे आता कमलनाथ सरकार धोक्यात आले आहे व भाजप कधीही नवे सरकार स्थापन करू शकते अशी परिस्थिती आहे. यानंतर सोशल मीडियावर भाजप समर्थकांकडून आता पुढचा नंबर महाराष्ट्राचा अशा पोस्ट पडायला सुरुवात झाली आहे. यावरच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विटर च्या माध्यमातून भाष्य केले आहे.
ते आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले की, “महाराष्ट्राची ‘पाॅवर’ वेगळी आहे. एक ऑपरेशन शंभर दिवसापूर्वी फसले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला. मध्यप्रदेशचा वायरस महाराष्ट्रत घुसणार नाही. चिंता नसावी.
जय महाराष्ट्र”
महाराष्ट्राची 'पाॅवर' वेगळी आहे. एक ऑपरेशन शंभर दिवसापूर्वी फसले आहे.त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला.मधयप्रदेशचा वायरस महाराष्ट्रत घुसणार नाही. चिंता नसावी.
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) March 11, 2020
