अखेर संजय राठोड यांनी राजीनामा दिला….
मुंबई, दि. २८: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर उठलेल्या वादळात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आणि राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. यानंतर रोज नवनवे ऑडिओ बाहेर येत राहिले. विरोधीपक्ष भाजपनेही या प्रकरणी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आंदोलन केले.
आज अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेत अखेर राठोड यांनी आपला राजीनामा सुपूर्त केला. राजीनाम्याननंतर भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राठोड यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.
