मुख्यमंत्र्यांकडून संजय काकडेंची नाराजी दूर
मुंबई: भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार अशा चर्चा होत्या. परंतु काकडे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आल्याचे समजते. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच संजय काकडे हे भाजपमध्येच राहणार असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले.
काकडे यांना भाजपकडून पुण्यात निवडणूक लढण्याची इच्छा होती, पण भाजपने त्यांना तिकीट न दिल्याने नाराज काकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. या चर्चांवर मुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम दिला आहे.
राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार आणि काँग्रेस नेते प्रविण छेडा यांच्या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर संजय काकडे देखील उपस्थित होते.
