दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर सांगलीमध्ये हळदीच्या सौद्यांना सुरुवात
सांगली, दि.५: सांगलीत पाडव्याच्या मुहूर्तावर आज हळदीच्या सौद्यांना प्रारंभ झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्या हस्ते हळदीचे सौदे सुरू झाले. आज आतापर्यन्त हळदीला क्विंटलला सात हजार पाचशे रुपये दर मिळाला आहे. डंकी हळदीला हा दर मिळाला आहे. सांगली हे हळद उद्योगाचं प्रमुख केंद्र आहे. हळद लागवड, काढणी प्रक्रिया साठवणूक या सर्व सोयी तिथं आहेत. तिथून हळदीची देशात आणि परदेशात निर्यात होते. आंध्र प्रदेश, कर्नाटक निजामाबाद, म्हैसूर, यासह देशातल्या अनेक ठिकाणांहून हळद विक्रीसाठी सांगलीत येते. हळद सौदे पद्धतीने एकीकडे थेट विक्री केली जाते. तर आता अलीकडे हळदीचा ऑनलाईन सौदा सुरू झाला आहे. दिवाळीपासून हळदीच्या खरेदी-विक्रीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते.
Source – AIR