मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीला उपोषणाला बसणार असल्याची संभाजीराजे छत्रपतींची घोषणा
मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीला मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याची घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत सामाजातल्या सर्व क्षेत्रातल्या प्रमुख लोकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. कायदेशीररीत्या टिकणारं आरक्षण मराठा सामजाला द्या, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली, परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण झाली नाही, आपण आत्तापर्यंत आक्रमक होतो, मात्र आता मी उद्विग्न झालो असल्याचं खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी म्हणाले.
#मराठा_आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करून मी माझी पुढील दिशा ठरविलेली आहे ; येत्या २६फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करणार आहे. pic.twitter.com/GOGzPu0DBF
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 14, 2022
