विधानसभा तालिका अध्यक्षांची व विधानपरिषदेत सभापती तालिका नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती जाहीर
मुंबई, दि. २७: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची आज घोषणा केली. विधानसभा सदस्य संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर, अमिन पटेल, डॉ. किरण लहामटे, समाधान आवताडे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
याचसोबत विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभापती तालिकेवरील सदस्यांची नावे जाहीर केली. विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड, विलास पोतनीस, अमोल मिटकरी, अभिजीत वंजारी, डॉ. मनीषा कायंदे यांना सभापती तालिकेवर नामनिर्देशित केल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केले.
