रॉजर फेडररची ची टोकियो ऑलिम्पिक मधून माघार
स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमधून गुडघ्याच्या दुखापतीमुळं माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आठ वेळा विंबल्डन किताब जिंकणाऱ्या फेडररने या आधी २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतूनही माघार घेतली होती. गेल्या आठवड्यातच विंबल्डन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये ह्युबर्ट हूरकॅझकडून फेडररला पराभव स्वीकारावा लागला होता.