रिक्षा-टॅक्सी चालकांना आता किमान भाडेवाढ हवी
अॅपवर आधारित टॅक्सी आणि रिक्षा यांच्या सेवेसोबतच रिक्षा-टॅक्सी चालकांना आता किमान भाडेवाढ हवी आहे. त्याबाबत मुंबई टॅक्सी मेन युनियनचे महासचिव ए. एल. क्वाड्रोज, मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष शशांक राव आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक यांनी आकाशवाणीला रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीबाबत प्रतिक्रिया दिल्या.
शशांक राव म्हणाले की, जी भाडेवाड दुप्पट करण्यासाठी दिली आहे, ते मुळात चुकीचं आहे. जे टॅक्सी-रिक्षाला निश्चित (फिक्स) भाडं आहे तेच रहावं,असं मत त्यानी व्यक्त केलं. क्वाड्रोज यांनी सांगितलं की, दोन रूपयांची भाडेवाढ लवकरात लवकर मिळाली पाहिजे. एक वर्षापर्यंत आम्ही काय करणार, असा सवाल त्यांनी केला.
भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक म्हणाले की, भारतीय कामगार सेना ही शिवसेना प्रणित युनियन आहे. पक्षाशी चर्चा करून पक्ष जी भूमिका घेईल, ती आमची भूमिका असेल.
