राज्यातील रेस्टॉरंट लवकरच होणार सुरू; आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री निर्णयाबाबत सकारात्मक
मुंबई, दि.२८: येत्या ऑक्टोबर महिन्यापासून राज्यात खाद्यगृह, रेस्टॉरंट्स सुरू होण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे दिसते. राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती संबंधितांना पाठविली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करताना म्हणाले.
मार्च महिन्यात देशात लॉकडाऊन सुरू झालं आणि इतर व्यवसायांप्रमाणे रेस्टॉरंट व्यवसायिकांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. हॉटेल कामगारही आपापल्या गावी निघून गेले. दरम्यान अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यावर खाद्यगृहातून फक्त पार्सल पदार्थ विक्रीची परवानगी देण्यात आली होती. पण फार कमी रेस्टॉरंट व्यवसायिकांनी आपली हॉटेल्स चालू केली. ऑक्टोबर महिन्यात जर रेस्टॉरंट चालू झाली तर नक्कीच ही या व्यावसायिकांसाठी दिलासादायक बाब राहील.
