रेमडेसिवीर देण्यास निर्यातदार तयार; दोन-तीन दिवसांत पुरवठा सुरळीत होईल – आरोग्यमंत्री
नवी दिल्ली: येत्या दोन ते तीन दिवसात रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होईल, असं आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं. आज कोविड टास्कफोर्सची विविध विषया संदर्भात बैठक झाल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.
राज्यातल्या १५ निर्यातदारांकडे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तयार साठा आहे. त्या घेण्यासंदर्भात या निर्यातदारांशी चर्चा झाली आहे. ५ राज्यांतून ऑक्सिजन आणण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. मोठ्या टँकर्समधून लवकरच हा ऑक्सिजन राज्यात आणला जाईल.
रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात करणाऱ्या सात ते आठ निर्यातदारांनी इंजेक्शन देण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
राज्याला दररोज ६० ते ७० हजार इंजेक्शनची गरज असताना केवळ ३५ ते ४० हजार इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. या निर्यातदारांनी इंजेक्शनचा पुरवठा केल्यानंतर इंजेक्शनची कमतरता भासणार नाही, असंही ते म्हणाले.
Source – AIR
