“रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा दोन दिवसात दूर करण्यासाठी प्रयत्नशील” – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई: कोविड बाधित रुग्णांच्या उपचारासाठीच्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. या इंजेक्शनचा निर्माण झालेला तुटवडा तात्पुरता असून, त्यासंदर्भात औषध उत्पादक कंपन्याशी चर्चा झाली असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
रेमडेसिवीर या अँटीव्हायरल इंजेक्शन निर्मात्या कंपन्यांमध्ये तात्पुरत्या स्वरुपाचा तुटवडा आहे. दोन दिवसांच्या आत या गोष्टी सुरळीत होतील. त्या कंपन्यांच्या एमडींशी चर्चा झालेली आहे. तुटवडा झाला म्हणून ब्लॅक मार्केटींग करावं आणि त्यातून कोणीतरी पैसे कमवावं असं होवू नये म्हणून, फुड ड्रगज अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना सूचीत केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
