Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Video भाग २ | ‘रिलायन्स कन्स्ट्रक्शन’ चे रईस लष्करीया यांचा ‘एसआरए’ सहकार विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने महाघोटाळा! बेघरांना वाली कोण?

‘रिलायन्स कन्स्ट्रक्शन’ चे रईस लष्करीया व ‘एसआरए’ सहकार मधील घोटाळेबाजांवर कारवाई कधी?

मुंबई, दि.२७: गेल्या काही काळापासून टीम महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम ‘आपली समस्या’ या जनसदरांतर्गत मुंबईतील (जी-दक्षिण) वरळी विभागातील ‘परेल सह्याद्रि सहकारी गृहनिर्माण वसाहती’तील समस्यांबाबत ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा'(SRA) कडे बातम्यांच्या माध्यमातून लक्ष वेधत आहे. प इमारत क्रमांक ३ मधील श्री. सावंत यांनी आपल्या व्यथा ऑन कॅमेरा आम्हाला सांगितल्या. आजच्या या बातमीत तुकाराम चोखामगरे यांनी येथील रहिवाश्यांच्या तक्रारींचा पाढाच कॅमेऱ्या समोर मांडला आहे. ते म्हणाले की ही मंडळी सध्या आपल्याच सोसायटीत आश्रितासारखी राहत आहेत. याच सोबत विकासकाने Raiees Yasin Lashkaria करारानुसार जी कामे करणे आवश्यक होती त्यांचीही पूर्तता केलेली नाही. ज्यात प्रामुख्याने मंदिर, कम्युनिटी सेंटर, मोकळे उद्यान यांचा समावेश होतो.

भाग २: त्रस्त रहिवाशाने बिल्डरवर Raiees Lashkaria केलेल्या खळबळजनक आरोपांचा व्हिडिओ पहा 

दरम्यानच्या या वर्षांमध्ये एसआरए सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक म्हणून राजेश लव्हेकर, स्मिता गायकवाड व रविंद्र इटकर यांनी काम पाहिले होते. पण यांच्या कार्यकाळातही विकासकावर कोणतीही कठोर कारवाई केली गेली नाही. येथील रहिवाश्यांच्या व पात्र एसआरए बाधितांच्या आवेदनांना कायमंच दुर्लक्षित केले गेले असा येथील राहिवाशांचा आरोप आहे.

या प्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, एसआरए चे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, स्थानिक आमदार तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जातीने लक्ष घालून येथील रहिवाशांना वेळीच न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. याच सोबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही अकार्यक्षम आधिकार्‍यांवर कठोर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. याच सोबत एसआरए सहकार विभागाने रिलायन्स कन्स्ट्रक्शन कंपनी सारख्या विकासकांवर युद्ध पातळीवर एक मोहीम घेऊन कारवाईचे सत्र संबंध मुंबईभर सुरू करणे हाच एकमेव उपाय सध्याच्या घडीला दिसतोय.

विकासक रईस लष्करीया Raiees Yasin Lashkaria यांच्या रिलायन्स कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मुंबईतील इतर भागातील एसआरए प्रकल्प बाधितांच्याही अशाच प्रकारच्या समस्या असतील तर त्यांनी आम्हाला खालील क्रमांकावर व्हाट्सअप्प व ईमेल द्वारे संपर्क करावा.

अनधिकृत बांधकाम, विकासकाकडून फसवणूक, सरकारी दिरंगाई व आर्थिक घोटाळे संदर्भातील आपल्या काही तक्रारी असतील तर महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम च्या ‘आपली समस्या’ टीम ला आपण 9372236332 वर व्हाट्सअप्प आणि news@maharashtravarta.com वर ईमेल द्वारे पुराव्यानिशी माहिती देऊ शकता.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *