RBI ची आर्थिक धोरण बैठक ८ ते १० फेब्रुवारी या काळात होणार
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेची आर्थिक धोरण विषयक समितीची ७ ते ९ फेब्रुवारी या काळात होणारी यंदाच्या आर्थिक वर्षातली शेवटची बैठक पुढे ढकलण्यात आली असून ती येत्या ८ ते १० फेब्रुवारी या काळात होणार आहे. ख्यातनाम गायिका लता मंगेशकर यांच्या निधनानिमित्त शोक व्यक्त करण्यासाठी राज्यसरकारनं आज सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं रिझर्व्ह बँकेनं काल जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
