“लोकांनी दक्ष राहून फॉरेक्स फसव्या जाहिरातींना बळी पडू नये” – आरबीआय
मुंबई: फॉरेक्स, अर्थात परदेशी विनिमयाबाबत काही अनधिकृत इलेक्टॅॉनिक व्यवहार संस्थांकडून फसव्या जाहिराती सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या जात आहेत. या संदर्भात भारतीय रिझर्व बँकेनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. ओटीटी वाहिन्यांवरील खेळांचे तसंच अन्य एप लोकांना वैयक्तिकरित्या संपर्क साधून जास्त परताव्याची खोटी आश्वासनं देत आहेत.
लोकांनी दक्ष राहून असल्या फसव्या आश्वासनांना बळी पडू नये, असंही आरबीआयनं म्हटलं आहे. फसवणुकीच्या अनेक तक्रारी आरबीआयकडे आल्या आहेत. त्य़ामुळे परदेशी विनिमय अधिकृत, संस्थांकडुनच करावं. अन्यथा अशांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा ईशारा आरबीआयनं दिला आहे.
