‘आरबीआय’ कडून बजाज फायनान्सच्या ‘या’ दोन कर्ज उत्पादनांच्या वितरणावर बंदी
मुंबई, दि. १५: भारतीय रिझर्व्ह बँकेनं बजाज फायनान्सला, त्यांच्या ईकॉम आणि इन्स्टा ईएमआय कार्ड या दोन कर्ज उत्पादनांअंतर्गत कर्जांना मान्यता आणि वितरण करायला बंदी घातली आहे. या दोन कर्ज उत्पादनांच्यासंदर्भात कर्जदारांना मुख्य तथ्यांविषयीचं विवरणपत्र न देणं आणि आणि या विवरणपत्रांच्या वितरणातल्या त्रुटींमुळे रिझर्व्ह बँकेने हा मनाई आदेश जारी केला आहे. तत्काळ प्रभावानं हा आदेश लागू असेल. रिझर्व्ह बँकेचं समाधान होईल अशारितीनं या त्रुटी दूर केल्यानंतर निर्बंधांचा फेरआढावा घेतला जाईल, असं बँकेनं म्हटलं आहे.
Source – AIR
