देशभरातले सर्व ‘चोट्टे’ मोदींविरुद्ध एक झाले आहेत – दानवे
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले चोट्टे एक झाले आहेत असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलं आहे. रावसाहेब दानवेंनी विरोधकांचा उल्लेख चोट्टे म्हणजेच चोर असा केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जालन्यातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये विकास कामांच्या बैठकीत बोलताना रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलं. तुम्ही माझ्या मागे उभं राहा मी तुम्हाला पैसे देतो असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे.
या व्हिडीओमध्ये रावसाहेब दानवे कार्यकर्त्यांना विचारत आहेत की, मोदींना पंतप्रधान करणार का ?….पुढे ते म्हणतात की, ‘कोणी काहीही म्हणो काहीही सांगो…देशातले सगळे चोट्टे मोदीं विरुद्ध एक झाले आहेत. रावसाहेब दानवेला पाडू असे बोलणाऱयांनो विसरू नका मी मोदींजीचा माणूस आहे’.