मुंबईतील ‘राणीची बाग’ आजपासून नागरिकांसाठी खुली
मुंबई: मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय म्हणजेच ‘राणीची बाग’ आजपासून नागरिकांसाठी खुली झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राणीची बाग नागरिक आणि पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. मात्र नागरिकांना मास्क घालण्यासह कोरोना विषयक नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे.
‘पर्यटकांनी उद्यानात गर्दी करू नये. तसंच लहान मुलं आणि वृद्धांनी उद्यानात येणं टाळावं’ असं आवाहन वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉक्टर संजय त्रिपाठी यांनी केलं आहे.
