पक्षवाढीसाठी रामदास आठवले उद्यापासून राज्यव्यापी दौर्यावर
रिपब्लिकन पक्षाची सदस्य नोंदणी गांभीर्याने करावी असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
नोंदणी न करणाऱ्या सदस्याला रिपाइं मध्ये स्थान राहणार नाही, असा इशारा त्यांनी मुंबई विभागीय बैठकीत नुकताच दिला आहे.
आठवले उद्यापासून राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि ठाणे या विभागांची विभागनिहाय बैठक घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या संघटनात्मक बांधणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील कामगिरी आणि पक्ष सदस्य नोंदणीचा आढावा घेणार आहेत.
उद्या दुपारी २ वाजता पुण्यातील सदाशिव पेठेत नवीपेठ इथल्या पत्रकार भवनच्या सभागृहात बैठक होणार असून आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
