राम मंदिरात होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्य सरकारकडून सोमवारी सुटी जाहीर
मुंबई, दि. १९: येत्या सोमवारी अयोध्येतल्या राम मंदिरात होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने राज्य सरकारने सुटी जाहीर केली आहे. यामुळे राज्य सरकारी कार्यालय, राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या संस्था सोमवारी बंद राहतील. राज्यातल्या बँकाह यामुळे रिझर्व्ह बँकेच्या मार्फत होणारे सरकारी रोखे,परकीय चलन आणि इतर व्यवहारही दिवसभर बंद राहतील. केंद्र सरकारी कार्यालयांना सोमवारी अर्ध्या दिवसाची सुटी आहे. दरम्यान देशातल्या शेअर बाजारात उद्या सकाळी सव्वा ९ ते १० आणि साडे ११ ते साडे १२ दरम्यान विशेष सत्रात व्यवहार होणार आहेत. शेअर बाजारांची माहिती तंत्रज्ञान यंत्रणा अचानक बंद पडली तर उभारण्यात आलेल्या पर्यायी व्यवस्थेची चाचणी या व्यवहारांच्या दरम्यान होईल.
Source – AIR
