Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्रातील आदित्य विजय ब्राम्हणे यांना मरणोपरांत राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर

यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांची घोषणा

नवी दिल्ली/मुंबई, दि. १९: प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) – असामान्य क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना दिला जातो. शौर्य, कला आणि संस्कृती, पर्यावरण, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा या श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना हे पुरस्कार दिले जातात. प्रत्येक पुरस्कारार्थीला  पदक, प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र दिले जाते.

राष्ट्रपतींच्या हस्ते २२ जानेवारी, २०२४ रोजी विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात पुरस्कार प्रदान केले जातील. यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी देशातील सर्व विभागांमधून असामान्य कामगिरी करणाऱ्या १९ मुलांची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ जानेवारी, २०२४ रोजी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधतील. २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातही ही मुले सहभागी होतील.

निवड झालेल्या मुलांच्या यादीमध्ये शौर्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या श्रेणींमध्ये प्रत्येकी एका मुलाचा तर समाजसेवेच्या श्रेणीत चार मुलांचा; क्रीडा प्रकारात पाच आणि कला आणि संस्कृती श्रेणीत सात मुलांचा समावेश आहे. या यादीत १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९ मुले आणि १० मुलींचा समावेश आहे. यादी खालीलप्रमाणे आहे.

प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार – २०२४

Sr. No. Name

 

State Category
Aaditya Vijay Bramhane (posthumous) Maharashtra Bravery
Anushka Pathak Uttar Pradesh Art & Culture

 

Arijeet Banerjee West Bengal Art & Culture
Armaan Ubhrani Chattisgarh Art & Culture
Hetvi Kantibhai Khimsuriya Gujarat Art & Culture
Ishfaq Hamid Jammu & Kashmir Art & Culture
Md Hussain Bihar Art & Culture
Pendyala Laxmi Priya Telangana Art & Culture
Suhani Chauhan Delhi Innovation
Aryan Singh Rajasthan Science & Technology
Avnish Tiwari Madhya Pradesh Social Service
Garima Haryana Social Service
Jyotsna Aktar Tripura Social Service
Saiyam Mazumder Assam Social Service
Aaditya Yadav Uttar Pradesh Sports
Charvi A Karnataka Sports
Jesicca Neyi Saring Arunachal Pradesh Sports
Linthoi Chanambam Manipur Sports
R Surya Prasad Andhra Pradesh Sports

 

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *