‘राजगृह’ हल्ला प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कडक कारवाईचे आदेश
मुंबई: काल सायंकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राहिलेल्या मुंबईतील ‘राजगृह’ वर दोन अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड केली होती. या घटनेचा सर्व स्थरातून निषेध करण्यात आला होता. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत.”
