“मला हिंदुहृदयसम्राट संबोधू नका”, मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे कार्यकर्ते-पदाधिकारी यांना आवाहन
मुंबई: मुंबईतील रंगशारदा मध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे फक्त १० मिनिटांसाठी आलेल्या पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना थोडक्यात संबोधित केले. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आपल्याला हिंदूह्रदयसम्राट संबोधू नका अशी सूचना केली. २३ जानेवारी रोजी मनसैनिकांनी राज यांना हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी दिली. यानंतर समाजमाध्यमांवर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटायला लागल्या होत्या.
आजची बैठक ‘एनारसी’ समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
