Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फकीर नव्हेत बेफिकीर : राज ठाकरे

Raj Thackarey

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फकीर नव्हेत बेफिकीर : राज ठाकरे

“नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष हे ठरवणार की राष्ट्रभक्त कोण ते? तुम्हाला कोणी अधिकार दिला हे ठरवण्याचा? नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त ना, मग नवाज शरीफना त्यांच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेले?” आज मनसेच्या १३व्या वर्धापनदिनाच्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. अजित डोवलांबद्दल बोलताना ते म्हणाले, “अजित डोवल कोण आहेत, हे राज ठाकरेंना माहीत आहे का असं लोकं विचारतात. हो मला माहित आहे. कॅरेवन ह्या मासिकावर १००० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणारे विवेक डोवल ही त्यांचा मुलगा. अजित डोवल यांच्या मुलाचा एक पार्टनर अरब आणि एक पाकिस्तानी आहे. हा पार्टनर चालतो का भाजपला हा देशद्रोह नाही?” “पुलवामा येथे जे घडले त्याची पूर्वसूचना गुप्तचर विभागाने दिली होती पण तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. जर पूर्वसूचना मिळून देखील खबरदारी घेतली गेली नसेल तर ह्याला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जबाबदार नाहीत का? अशी खरमरीत टीका करून राज ठाकरे पुढे म्हणाले मोदी हे फकीर नव्हेत बेफिकीर आहेत. भारतीय हवाई दलाने केलेल्या एयर स्ट्राईक नंतर मोदींनी त्याचा निवडणुकीचा मुद्दा म्हणून वापर करायला सुरुवात केल्याचा आरोपही त्यांनी मोदींवर केला.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *